लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही – सोनिया गांधी

0
499

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी)  –  पुढे येणारे दिवस खडतर आहेत. तरी देखील तुमचा पाठिंबा आणि विश्वासाच्या जोरावर काँग्रेस पक्ष प्रत्येक आव्हानाला पार करेल. लढाई कितीही मोठी असो, मी मागे हटणार नाही. तुम्हा सर्वांना वचन देते की, देशाच्या प्रतिमेसाठी आपण सर्वस्व पणाला लावण्यासाठी तयार  आहोत, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवून दिल्याबद्दल खासदार सोनिया गांधी यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि स्वाभिमान दलाच्या कार्यकर्त्यांचे  आभार मानले.  याबाबत सोनिया गांधी यांनी पत्र लिहून रायबरेलीच्या जनतेचे आभार मानले आहेत.

या पत्रात सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. माझे जीवन तुमच्या सर्वांसमोर खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. तुम्ही सर्व माझ्या कुटुंबियाप्रमाणे आहात. तुमच्याकडून मला प्रेरणा मिळते. हीच माझी संपत्ती  आहे, असे त्या म्हणाल्या.