वाकडच्या जॅमिंग समस्येबाबत नागरिक, पोलीस लोकप्रतिनिधींची बैठक; राहुल कलाटे यांचा पुढाकार

0
269

वाकड, दि. १०(पीसीबी)- दत्तमंदिर व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक समस्येवर उपाय योजना करण्यासाठी
रहिवाशी, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या समस्येला सर्वस्वी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत त्यांच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी ताशेरे ओढले. यापुढे तात्पुरता व प्रायोगिक तत्वावर पी१, पी२ पार्किंग व्यवस्था करण्यासह प्रत्येकाने स्वतःला स्वयंशिस्त लावण्यावर बैठकीत एकमत झाले.

या बैठकीला राहुल कलाटे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, वाकड वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, दीपक गायकवाड यांच्यासह विविध सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध अतिक्रमणांमुळे रस्त्यात होणाऱ्या बेशिस्त अन बेकायदा पार्किंगने विकेंडला रस्ते जाम होतात. त्याचा सर्वांनाच मोठा मनःस्थाप सहन करावा लागतो. सत्यवान माने म्हणाले गंभीर गुन्ह्यांना खतपाणी घालणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी वारंवार आयुक्तांकडे पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नाही सर्व सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे,नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी जेणे करुन नियम मोडण्याची भीती लोकांत निर्माण होईल, एकेरी वाहतूक करावी, पार्किंग क्षेत्रांची निर्मिती करावी, पी-वन, पी-टू पार्किंग व्यवस्था राबवावी, पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, पदपथावरील आठवडे बाजार हटवावे, अतिक्रमण विभागाने देखील कारवाईत कसूर न करता सातत्याने कारवाई करावी असे उपाय काही नागरिकांनी सुचविले.

ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला माझ्या कार्यालयाकडून यापूर्वीच पत्रव्यवहार झाला आहे.
बैठकीत नागरिकांच्या समस्या, तक्रारी समजून घेतल्या. त्यांनी सुचविलेले उपाय, सलले यांना विचारत घेतले जाईल. परिसरातील रस्त्यांची निर्मिती होताना अशा समस्या काही दिवस उद्भवतात त्यामुळे आता किमान दत्त मंदिर रस्ता होईपर्यंत महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र घेेेऊन प्रायोगिक तत्वावर पी१, पी२ व्यवस्था राबविण्यात येईल, असे राहुल कलाटे म्हणाले.