वसंत व्याख्यानमाला समारोप प्रसंगी संगीतमय सुरेल सफर

0
217

निगडी, दि.२९ (पीसीबी):- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी आयोजित वसंत व्याख्यानमाला समारोप प्रसंगी जितेंद्र भूरुक प्रस्तुत लता किशोर आशा एक सुरेली सफर या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक प्रबोधन बरोबर मनोरंजन या उद्देशातून संस्थेने उपस्थित श्रोत्यांना संगीताची भव्य मेजवानी दिली.प्रति किशोरकुमार म्हणून प्रसिध्द असलेले गायक जितेंद्र भुरुक यांनी सादर केलेल्या गीतांना श्रोत्यांनी भरभरून दिली. सोबत सहगायिका अश्विनी कुरपे, दृष्टी बालानी व नमिता यांनी उत्तम साथ दिली साथ दिली.प्रसिध्द निवेदिका, प्राजक्ता मांडके यांनी या सुरेल सफरीचे सूत्र संचालन केले.

कार्यक्रम प्रारंभी झालेल्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, डॉ. निवेदिता एकबोटे, सदस्य श्री दिपक मराठे, विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई खापरे माजी नगर सदस्या श्रीमती सुमनताई पवळे व सुलभाताई उबाळे, याप्रसंगी सौ उमाताई खापरे व जितेंद्र भूरुक यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्था कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले व सर्वांचे धान्यवाद मानले तसेच सौ उमाताई खापरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी परिचय सौ अश्विनी भरगुडे यांनी करवून दिला तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ आशा कुंजीर यांनी केले तर शेवटी आभार सौ. ज्ञाती चौधरी यांनी मानले.

गायक जितेंद्र भुरूक यांनी आपल्या शैलीत सुरुवात केली पुढे त्यांनी सादर केलेल्या किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांना खूप प्रतिसाद मिळाला – झूम झूम झुमरू, ओ हंसिनी, आने वाला पल, पाच रुपय्या बारा आणा, हाल कैसा है जनाब का, तेरे बिना जिंदगी से, गाता रहे मेरा दिल, तुम आ गये हो, मेरे मेहबूब, परदेशीया , मच गया शोर, देखा ना हायरे, अशी गाणी सादर करण्यात आली त्यामुळे सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.

संगीत संयोजन मध्ये तबला ढोलकी रोहित साने, ड्रम वर अभिषेक भुरुक, बासरी सचिन वाघमारे, गिटार वर रेणू व हार्दिक रावळ, सेक्सोफोन वर बाबा खान तर सिंथेसायझर वर रशिद शेख यांनी साथ दिली  या कार्यक्रमात दृक- श्राव्य सादरीकरण साठी प्रा. समीर नेर्लेकर यांनी नियोजन केले. संपूर्ण व्याख्यानमालेसाठी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचे संयोजन संकुलातील मुख्याध्यापक श्री प्रकाश पाबळे, श्री.पांडुरंग मराडे, मुख्याद्यापिका सौ गौरी सावंत,सौ तृप्ती वंजारे, सौ संगीता घुले, प्राचार्य डॉ प्रविण चौधरी डॉ. शशिकांत ढोले, डॉ. अरूणा देऊस्कर, डॉ. सदाशिव शिरगावे डॉ. मैथिली अर्जुनवाडकर, डॉ.अतुल फाटक, समन्वयक नरेंद्र चौधरी व सुजाता बलकवडे यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे उपकार्यवाह डॉ.प्रकाश दीक्षित प्राचार्य,डॉ. संजय खरात, डॉ.मिलिंद आळंदीकर, सदस्य,सौ. मृगजा कुलकर्णी, श्री उद्धव खरे श्री. राजीव कुटे, प्रा. योगेश ठिपसे, श्री प्रमोद शिंदे, सौ मोनिका वैद्य, श्री दत्तात्रय पाटोळे श्री.राजन देवकाते, श्री.दादाभाऊ शिनलकर, सतिश लिंभेकर श्री. गणपत नांगरे आदी संस्था पदाधिकारी उपस्थित होते.