वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार – अजित पवार

0
397

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केली.  त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर आघाडीकडून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न असेल.  

पवार म्हणाले की, येत्या २ ऑक्टोबर रोजी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.  आघाडीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टी, आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा समावेश करण्यात येणार  आहे.

थोडं थांबा. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निघून घेल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. आम्ही काट्याने काटा काढणार आहोत. सुरुवात त्यांनी केली, आता शेवट आम्ही करणार आहोत, असा सुचक इशारा पवार यांनी दिला.