वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीतील अॅड. विजय मोरे यांना माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी

0
977

पंढरपूर, दि. ४ (पीसीबी) – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश  आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघ लढवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघातून बारामती येथील धनगर समाजाचे नेते अॅड. विजय मोरे यांची उमेदवारीही त्यांनी घोषित केली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला धक्का  बसला आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी वंचत बहुजन आघाडीची चर्चा झाली होती. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने १२ जागांची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात ३० जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यासही काँग्रेसला सांगण्यात आले होते. परंतु, काँग्रेसने आपला अंतिम निर्णय कळवलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून बारामतीचे धनगर समाजाचे नेते अॅड. विजय मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा त्यांनी केली.”