लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवणं गरजेचं – प्रणव मुखर्जी

0
407

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – लोकसभेतील खासदारांची संख्या १००० करणे गरजेचं आहे, तर राज्यसभेतील खासदारांची संख्याही त्याप्रमाणे वाढवणे गरजेचं असल्याचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुचवलं आहे.

भारताची लोकसंख्या खासदारांच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे एका खासदाराला आधीपेक्षा जास्त लोकांच प्रतिनिधित्व करावं लागत आहे. त्यामुळं खासदारांना अनेक अडचणी येऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे शक्य होत नाही, असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

सध्या लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा ५५२ आहे, तर राज्यसभेतील खासदारांची मर्यादा २५० आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या आधारावर सध्या एक खासदार जवळपास १६ लाख लोकांच प्रतिनिधित्व करतं आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.