लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप

0
791

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरी येथील पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप करण्यात आला, त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हनुमंतनाना कसबे, भगवान शिंदे, अरुण जोगदंड, नितीन घोलप, शिवाजी साळवे, किशोर हातागळे, भिमा वाघमारे, गणेश साठे, सचिन वाघमारे, दिपक खंडाळे, बाळासाहेब गालफाडे, मुकुंद गायकवाड, सुरेश पाटोळे, आदिकेत वाघमारे, संजय येवलेकर, विकास भवाळ, ऋषिकेश कसबे, सत्यवान रोकडे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातही पुरस्थिती निर्माण झाली असुन दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड यासह नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली असुन भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, याचीच दखल व सामाजिक बांधिलकी जपत मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरीतील स्व.संजय गांधीनगर व रिव्हर रोड येथील पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.