लॉकडाऊननंतरही दहा लाखाहून अधिक आयटी कर्मचारी घरून काम करतील – गोपाळकृष्णन

0
349

 

दिल्ली, दि.२७ (पीसीबी) – आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांनी आता लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरही घरून काम करण अपेक्षित आहे, असे विधान आय टी क्षेत्रातील उद्योजक गोपाळकृष्णन यांनी केले आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी वर्क फ्रोम होम बाबत भाष्य केले.

ते म्हणाले की, आज अनेक आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे घरी बसून काम करत आहेत. अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचऱ्यांना तंत्रज्ञांच्या जोरावर जोडून घेतले आहे. यासाठी कंपन्यांनी कामाच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्यामुळे आता सगळ पूर्ववत झाले तरी कामगारांनी घरण काम करणचं अपेक्षित आहे.

आज अनेक कंपन्यांनी आपल्या क्लाईटंंला सांगून आपल्या काम करण्याच्या पद्धती बदल्या पाहिजेत. एवढा मोठा कारभार मॅॅनेज करणे काही सोपे नाही. तरीदेखील आयटी कंपन्यांनी काही बदल केले पाहिजेत. आज मला असे सांगण्यात आले आहे की, ९० ते ९५ टक्के लोक हे आज घरी बसून काम करत आहेत. ते काम सुरळीत आणि फस्ट चालू आहे, त्यामुळे लॉकडाऊनवर आता आयटी क्षेत्राने पर्याय शोधला आहे. आता हा पर्याय भविष्यात नियोजित व्यवसाय निरंतर प्रक्रियेचा भाग होईल, असे गोपाळकृष्णन म्हणाले.

तसेच लॉकडाउन उठल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य स्थितीत परत आल्यानंतरही किमान 20 ते 30 % टक्के आयटी कर्मचारी घरून काम करणे सुरू ठेवतील, असा विश्वास गोपालकृष्णन यांनी व्यक्त केला. तर काही कंपन्या अधिक आक्रमक होतील, कंपन्या जितक्या लहान असतील तितक्या अधिक आक्रमक होतील, जेणेकरून भाड्याच्या खर्चाच्या बाबतीत ते लक्षणीय बचत करू शकतील, असेही गोपाळकृष्णन म्हणाले.