कोरोनाच्या जलद टीममधील शिक्षकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड

0
504
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद प्रतिसाद  पथकातीत दांडी मारणा-या दोन शिक्षकांवर आयुक्तांनी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोघांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला. संजय दगडु धोत्रे आणि संदीप एकनाथ शेळके अशी कारवाई केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या पथकाची स्थापना कऱण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांंच्या नियुक्त्या कऱण्यात आल्या आहोत. नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता त्यात काम करणे अपेक्षित आहे. शिक्षक धोत्रे आणि शेळके यांनी या कामाला दांडी मारली. त्यांना कारणे दाखवा नोटीस काढली असता त्यांनी उत्तर दिले पण ते समाधनकारक नसल्याने त्यांंच्यावर दंडात्मक  कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यात टाळाटाळ केली अथवा पुन्हा कर्तव्यात कसूर केली तर जबर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.