लादेनला मारले जाऊ शकते, तर काहीही होऊ शकते – अरूण जेटली

0
390

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – कुरकर्मा ओसामा बीन लादेनला मारले जाऊ शकते, तर काहीही होऊ शकते, असे सुचक विधान अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान भेदरला आहे. पाकच्या  विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकले. या पार्श्वभूमीवर जेटली यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.    

दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई केली, तर ती न्यायिक आहे, हे अमेरिकेने दाखवून दिले आहे. जगामध्ये कोणीही त्याला विरोध केला नाही. भारतही अशा प्रकराची कारवाई करु शकतो. त्याला विरोध होण्याचे कारण नाही. भारताने केलेली कारवाई याचप्रकारची होती. जी कारवाई झाली ती पाक व्याप्त काश्मीरमध्ये झाली.

दरम्यान, पाकिस्तानने सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारताने उत्तर देत जम्मू आणि काश्मीर नियंत्रण रेषेवरील त्यांच्या पाच चौक्या उद्‌ध्वस्त केल्या. या कारवाईत पाक सैनिक मारले गेले. तसेच भारताच्या हद्दीत घुसलेले पाकिस्तानचे एक विमान पाडण्यात आले आहे.