लव-जिहाद विरोधात अभाविपचे निदर्शन

0
250

चिंचवड,दि.०७(पीसीबी) : काही दिवसांपूर्वी हरियाणातील बल्लभगड येथे धर्मांतर न केल्या कारणाने विद्यार्थिनी निकिता तोमर हिची भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली आणि संपुर्ण देश हादरून गेला आहे, त्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये ही दिसून आले या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगराच्या वतीने चाफेकर वाडा येथून निषेध फेरी काढण्यात आली.

चिंचवड येथील चापेकर चौकात जोरदार घोषणाबाजी देऊन, आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करत जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, पिंपरी चिंचवड विस्तार अशोक सैनी,पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर,सह संयोजक ऋषी विडोळे, महानगरमंत्री तेजस चवरे, संभाजी शेंडगे, शुभम मोटे, वैभव बिरंगल,प्रतीक्षा काटकर,रोहन सावणे, वैभव जगताप, चिंतामणी खरात, आकाश वाघमारे, आदेश पडवळ, साहिल भुताडा आदी उपस्थित होते.