लग्न वरातीत घोड्याने लाथ मारल्याने एका मृत्यू

0
626

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – लग्न वरातीत घोड्याने एकाला जोराची लाथ मारल्याचा एकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना माढा तालुक्यातील अंजनगावात घडली.

अनिल गायकवाड असे घोड्याची लाथ लागून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावातील किसन वाघमोडे यांच्या घरी लग्न होते. लग्नातील धार्मिक विधीसाठी नवरदेवाची मिरवणूक घोड्यावरुन मंदीराकडे रवाणा झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी नवरदेवाचा घोडा बँडच्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली. नाचत असताना अचानक घोडा बिथरला आणि त्याने पाठीमागे उभ्या असलेल्या अनिल गायकवाड यांना जोरात लाथ मारली. घोड्याने मारलेल्या लाथेमुळे अनिल जमिनीवर कोसळले. त्यानंतर अनिल यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे लग्न सभारंभात घोडा नाचवण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली आहे.