लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार, साडेसहा लाखांची फसवणूकही

0
703

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून तरूणीची ईच्छा नसतानाही तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तसेच तिची साडेसहा लाखांची फसवणूक करण्यात आली. हि घटना फेब्रुवारी २०१८ ते मे २०१९ दरम्यान आकुर्डीत घडली. याबाबात एका २७ वर्षीय तरूणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी करण राहुल तळेगावकर (वय २३, रा. शंकर महाराज मठासमोर, के. के. मार्केट, कात्रज) या संशयित आरोपी विरोधात बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याने आकुर्डीतील एका तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तीच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान, त्यात तरूणी गरोदर राहिली असता तिचा विश्वास संपादन करून गर्भपात केला. तसेच तीच्याकडून ६,६०,००० रोक रक्कम, दोन तोळ्याचे दागिने व वडिलांच्या नावे असलेली दुचाकी घवून परत न करता तीची फसवणूक केली. तुझी व तुझ्या घरच्यांची लाईफ बरबाद करून टाकेन, अशी धमकीही दिली. त्यामुळे पीडीत तरूणी पोलिसांत धाव घेत करण विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहे.