राष्ट्रवादी का नको; प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा खुलासा  

0
493

अकोला, दि. २८ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीत  फटका बसल्याने  महाआघाडीत  प्रकाश आंबेडकर यांना घेण्यास काँग्रेस आग्रही आहे. पण राष्ट्रवादी सोबत असेल, तर आपण महाआघाडीत येणार नसल्याची भूमिका  प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादी  भाजपसोबत आहे. तसेच राष्ट्रवादी ही भाजपला कधीही जाऊन मिळू शकते. त्यामुळे आमचा त्यांना विरोध  आहे, असे आंबेडकर यांनी   अकोल्यात आज (बुधवार)  पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  राष्ट्रवादी महाआघाडीत असेल, तर आम्ही काँग्रेससोबत येणार नसल्याचेही  आंबेडकर यांनी  म्हटले  आहे.

आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला ग्रहीत धरलेले नाही. आम्हाला राष्ट्रवादी नको, ही बाब अगदी स्पष्ट  आहे. आता निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आता आमची अंतिम  भूमिका  ३१ ऑगस्ट रोजी स्पष्ट करू,  असेही आंबेडकर यांना सांगितले.

दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असुद्दिन ओवेसी  यांच्यासोबत आमचे संबध खूप चांगले आहेत. युती करण्याचे आमचे  ठरले आहे,  असेही आंबेडकर यांनी यावेळी  सांगितले.