राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएल कर्मचा-यांचे सातव्या आयोगानुसार वेतन होण्याचा मार्ग मोकळा.

0
375

महापालिकेने स्वहिश्याचे चार कोटी रुपये पीएमपीएलकडे केले वर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली होती आयुक्तांकडे मागणी

 

पिंपरी,दि. ८ (पीसीबी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार फेब्रुवारीपासूनचे वेतन देण्यासाठी पिंपरी महापालिकेने स्वहिश्यांची 4 कोटी रुपयांची रक्कम पीएमपीएमएल देण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. त्यांच्या विनंतीला मान देत आयुक्त राजेश पाटील यांनी तत्काळ महापालिकेच्या हिश्याचे 4 कोटी रुपये पीएमपीएमला दिले. त्यामुळे पीएमपीएमएलच्या 12 हजार कर्मचा-यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन सातव्या आयोगानुसार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेने त्यांच्या हिश्याचा निधी वर्ग करताच कामगारांचे वेतन होईल आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण आहे.

पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सुनील नलावडे, दीपक गायकवाड म्हणाले, पीएमपीएमएलच्या चेकर, नियंत्रकांचे वेतन झाले नव्हते. सातव्या आयोगानुसार वेतन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपला 4 कोटी रुपयांचा हिस्सा पीएमपीएमएलला दिला नव्हता. त्यामुळे कामगारांचे पगार थांबले होते. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.

महापालिकेने सातव्या वेतन आयोगासाठी 4 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. स्थायी समितीनेही त्याला मान्यता दिली. त्यामुळे मंजूर निधी तत्काळ पीएमपीएमएल वर्ग करावा, अशी विनंती शहराध्यक्ष गव्हाणे यांनी आयुक्तांना केली. आयुक्त राजेश पाटील यांनी गव्हाणे यांच्या विनंतीला मान देत आणि कामगारांची गरज लक्षात घेऊन ताबडतोब 4 कोटी रुपयांचा निधी पीएमपीएलला वर्ग केला.

त्यामुळे सातव्या आयोगानुसार फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएलला कर्मचा-यांचा सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल. पुणे महापालिकेने त्यांच्या हिश्यांचे सहा कोटी रुपये बाकी आहेत. ते आल्यास पीएमपीएमएल कर्मचा-यांचे सातव्या आयोगानुसार वेतन होईल. यासाठी पीएमपीएमएलचे समन्वय अधिकारी शांताराम वाघेरे यांचे विषेश सहकार्य लाभले.

राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे पदधिकारी किरण देशमुख, संतोष शिंदे, दिपक गायकवाड, संदीप कोंढाळकर, योगेश चौधरी, निलेश शेलार, जितू पोरे, राजेश पठारे, प्रफुल्ल शिंदे, आकाश तिवारी, सोमनाथ भोसले, विराज कसबे, संदिप सोमवंशी, महादेव पालवे आदी उपस्थित होते.