राष्ट्रवादीचे युवानेते आतिश बारणे यांच्याकडून मोशी परिसरासाठी चार रुग्णवाहिका

0
451

मोशी, दि. ३ (पीसीबी) पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना सदृश रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष, मोशी गावचे युवा नेते आतिश बारणे यांनी पुढाकार घेत चार रुग्णवाहिका मोशी व पिंपरी-चिंचवड परिसरासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवार (2 ऑक्टोबर) रोजी पार पडला.

“कोरोना काळात राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची होणारी हेळसांड कमी होईल. या रुग्णवाहिका मोफत सेवेमुळे या भागासाठी संजीवनी ठरतील, असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. ‘कोरोनाच्या लढाईत विविध माध्यमांतून आजपर्यंत सक्षम प्रयत्न आपण करीत आलो आहोत. येथील जनतेची अत्यावश्यक गरज पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकेची मोफत सेवा आपण देणार आहोत.’ असे आतिश बारणे यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदर विलासशेठ लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, नगरसेवक विक्रांत लांडे, शाम लांडे, पंकज भालेकर, विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, मा. सरपंच हरिभाऊ सस्ते, युवा नेते यश दत्ताकाका साने, युवा नेते गणेश सस्ते, युवा नेते नितिनदादा सस्ते, युवा नेते राहुल बनकर उपस्थित होते.