राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या स्वीय सहायकावर प्राणघातक हल्ला

0
600

पुणे, दि. ३० (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या स्वीय सहायकावर प्राणघातक हल्ला  आज (मंगळवार) करण्यात आला.  स्वीय सहायक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे  हा हल्ला करण्यात आला आहे.

या हल्यात दांगट दाम्पत्य जखमी झाले आहे.  त्यांना रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. दरम्यान, दांगट यांना राजकीय वैमनस्यातून  हा हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.