पुण्यात गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने घराला आग; दोघे गंभीर जखमी

0
487

पुणे, दि. ३० (पीसीबी) – गुरुवार पेठेतील शीतलादेवी चौकाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलिंडरमध्ये गळती झाल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली.

या घटनेत अनुपमा किशोर जोशी (वय ५५) आणि हेमांशु किशोर जोशी (वय ३०) हे दोघे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारपेठ येथील शीतलादेवी चौकाजवळ असणार्‍या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबीय राहतात. घरातील गॅस सिलिंडर संपल्याने सकाळी त्यांनी नवीन सिलिंडर लावला. यादरम्यान, नवीन सिलिंडरमधून गॅस गळती झाली आणि घरात आग लागली. या आगीत अनुपमा जोशी आणि हेमांशु जोशी हे दोघे गंभीर जखमी झाले. घरातील धूर पाहून शेजारी राहणाऱ्यांना जोशी यांच्या घरात आग लागल्याचे समजले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या आगीत घरातील काही प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे.