राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; सुलक्षणा धर, सुनिल शेळके यांना उमेदवारी

0
955

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.  या यादीत  नांदगावमधून पंकज भुजबळ, माढ्यातून  विद्यमान आमदार बबन शिंदे, पिंपरीतून सुलक्षणा धर-शिलवंत  तर मावळमधून सुनिल शेळके यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.  

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

जळगाव शहर- अभिषेक पाटील

बाळापूर – संग्राम गुलाबराव गावंडे

कारंजा – प्रकाश डहाके

मेळघाट – केवळराम काळे

अहेरी – धर्मराजबाबा आत्राम

दिग्रस – मो. तारीक मो. शमी

गंगाखेड – मधूसुदन केंद्रे

कन्नड – संतोष कोळगे

नांदगाव – पंकज भुजबळ

बागलाण – दीपिका चव्हाण

देवळाली – सरोज अहिरे

कर्जत – सुरेश लाड

खेड आळंदी – दिलीप मोहिते

मावळ – सुनील शेळके

पिंपरी चिंचवड – सुलक्षणा शिलावंत

आष्टी – बाळासाहेब आजबे

माढा – बबनदाद शिंदे

मोहोळ – यशवंत माने

माळशिरस – उत्तमराव जानकर

चंडगड – राजेश नरसिंग पाटील