राष्ट्रवादीकडून २० इच्छूकांच्या मुलाखती

0
560

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निवडणूक घडवू इच्छिणाऱ्या एकूण २० जणांनी रविवारी मुलाखती दिल्या. गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी महिला अध्यक्षा विद्या चव्हाण व युवा नेते पार्थ पवार यांनी या मुलाखती घेतल्या. अशी माहीती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

चिंचवड विधानसभेसाठी राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे, विठ्ठल (नाना) काटे, प्रशांत शितोळे, सतिश दरेकर तर पिंपरी विधानसभेसाठी ॲड. गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, आण्णा बनसोडे, काळूराम पवार आणि भोसरी विधानसभेसाठी विलास लांडे, शांताराम भालेकर, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी इत्यादी इच्छूक मुलाखतीस उपस्थितीत होते.