राज्यातील तीन जिल्ह्यात आयकर विभागाचे छापे; १८० कोटींची बेहिशोबी मालमत्तांवर कारवाई

0
467

नाशिक, दि. २५ (पीसीबी) – नाशिक, धुळे आणि जळगाव या तिन जिल्ह्यात आयकर विभागाने विविध क्षेत्रातील व्यावासायांवर छापे टाकले आहेत. यामध्ये तिन्ही जिल्ह्यांतून तब्बल १८० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. तर प्रसिध्द डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबवरही कारवाई करण्यात आली.  

प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या कारवाईला सुरुवात झाली होती. यामध्ये २० ते ३० डॉक्टरांच्या सुमारे ५० ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा या मूळ संशयातून ही कारवाई करण्यात आली. केवळ डॉक्टरांच्याच नाहीतर नाशिक जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योगावरही छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईत बेहिशोबी रोख रक्कम, दागिने, कागदपत्रे, आणि मिळकती मिळाल्या आहेत. त्यांची छाननी सुरु आहे. जवळपास १८० कोटींची बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. अनेक ठिकाणच्या नोंदीही संशयास्पद आहेत. छाप्यानंतर अनेकांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात येणार आहे.