राज ठाकरेंनी पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला

0
763

पुणे, दि. ३ (पीसीबी) – राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नसल्याने ते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांना भेटून काय होणार आहे? यापेक्षा ठाकरेंनी पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यावे. असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला.

पुण्यात नविन विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला. त्यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, राजाभाऊ सरोदे उपस्थित होते.

आठवले म्हणाले, विरोध गलितगात्र झाले आहेत, त्यामुळे ते आता इव्हीएमला पुढे करुन सरकारवर निशाना साधत आहेत. काँग्रेसने तेव्हा मतपत्रिकेवर बोगस मतदान होते. म्हणून इव्हीएम मशिन समोर आणले. आता मोदींना मतदान मिळतेय म्हणून मशिनवर संशय घेतले जात आहे. लोकांमध्ये मोदींबद्दल भावना चांगली आहे, त्यामुळे आपोआप कमळाकडे बटन जात. राष्ट्रवादीचे घड्याळ दहा दहाच्या पुढे जात नाही, आणि काँग्रेसचा हात हालत नाही.

आठवले पुढे म्हणाले, ”मोदी उस्तादांचा उस्ताद आहे, जाती धर्माच्या पलिकडे गेलेला माणूस आहे.  आमची मतपत्रिकेवर निवडणूकीला समोर तयारी आहे, तरीही मोदी जिंकले तर पुन्हा मतदान केंद्र ताब्यात घेतले, अधिकाऱ्यांनी शिक्के मारले असा आरोप करतील,” अशा शब्दांत आठवले यांनी टोला लावला.

”विधानसभेसाठी २२ जागांसाठी पत्र दिले आहे,  त्यातील १० जागा मिळाल्या पाहिजेत.  पुण्यातून कँन्टोन्मेंट व पिंपरी या दोन जागांची मागणी केली आहे.” असे आठवले यांनी सांगितले.