‘एमव्हीएमएल’ युनियनच्या अध्यक्षपदी सागर भोसले; सुशांत मोहिते सचिव

0
795

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – चाकण एमआयडीसीतील एमव्हीएमएल कामगार असोशिएट्स युनियन पदाधिकाऱ्यांची निवडणूक नुकतीच पार पडली.  अध्यक्षपदी सागर मारूती भोसले, तर सचिवपदी सुशांत मोरेश्वर मोहीते यांची निवड करण्यात आली आहे.

चाकण एमआयडीसीतील महिंद्रा व्हेईकल मॅन्यूपॅâक्चर लिमिटेड ही वाहन उद्योगातील एक अग्रगण्य वंâपनी आहे. या वंâपनीमध्ये एमव्हीएमएल कामगार असोशिएट्स युनियन कार्यरत असून त्याची त्रैवाषिक निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. दहा जागांच्या या निवडणूकीतील अध्यक्ष ते खजिनदार पदासाठी १९, तर सदस्यपदासाठी २३ अशा एवूâण ४२ कामगारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. वंâपनीतील २३७० कामगार मतदारांपैकी २१३१ कामगारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

त्यामध्ये अध्यक्षपदी सागर भोसले, तर सचिवपदी सुशांत मोहीते यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये विजय तुकाराम निंबळे (उपाध्यक्ष), रविंद्र मारूती काळभोर (सह सचिव), पवनकुमार सुभाष जाधव (खजिनदार), विक्रमसिंह आनंदा पाटील,  सुयोग भालेकर, शंकर शांताराम ढमाले, सागर नंदलाल केवट आणि योगेश डावरे (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. अॅड. प्रशांत क्षीरसागर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.