राज ठाकरेंच्या स्टेजवरील चिले कुंटु्ंबाचा पाकिस्तानशी संबंध; विनोद तावडेंचा आरोप

0
685

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडीओ’असे म्हणत भाजपची पोलखोल सुरू केली आहे. मुंबईतील काळाचौकी येथील सभेत राज ठाकरे यांनी चिले कुटुंबाला स्टेजवर आणले होते. या कुटुंबाचा पाकिस्तानशी संबंध  आहे, असा गंभीर आरोप करून  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन चिले कुटुंबांवर आरोप केला आहे.

राज ठाकरे यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’या  जाहिरात फोटो असलेल्या  चिले कुंटुंबाला  मुंबईतील सभेत स्टेजवर  आणून  खोट्या जाहिरातीची पोलखोल केली होती.  त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्यानंतर यावर उत्तर देण्यासाठी  तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आपल्या ठाकरी शैलीत भाजपच्या  आयटी सेलचे वाभाडे काढले.  भाजपचे लावारीस आयटीवाले कोणाचेही फोटो घेवून त्याचा उपयोग खोट्या जाहिरातीसाठी करत आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून त्यांनी गेल्या वर्षात जनतेची दिशाभूल केली आहे. आता तावडेंच्या आरोपांना राज ठाकरे कसे उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.