राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करावी – शत्रुघ्न काटे.

0
168

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

निवेदनात प्रभाग क्र.२८ मध्ये पाण्याच्या समस्येबाबत लक्ष वेधले आहे. राजमाता जिजाऊ उद्यानात २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. सर्व काम पुर्ण झाल्यानंतर ही अजून ही पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आलेली नसल्यामुळे पानी पुरवठ्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भेडसावत आहे. पालिकेमार्फत दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पण अनियमित आणि कमी दाबाने होणारा आहे ज्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

नवीन टाकी कार्यान्वित होण्यास एवढा विलंभ का लागत आहे? यामध्ये काय अडचणी आहेत ? अश्या नागरिकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे श्री बापु काटे यांनी या निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी केली आहे तसेच राजमाता जिजाऊ उद्यानातील सदर नवीन टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.