“राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक!” – ॲड. रामराजे भोसले

0
96

पिंपरी,दि. १३ (पीसीबी)- “राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक दर्जाचे आहे! बाल शिवाजी यांच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेब यांनी जगात आदर्श मानल्या जाणाऱ्या राज्याची निर्मिती केली; तर स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्मातील विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली!” असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी पिंपरी न्यायालय सभागृह, नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या प्रथेप्रमाणे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि ज्ञानसागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ॲड. रामराजे भोसले यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी ॲड. पडवळ, ॲड. मंचरकर, ॲड. परब, ॲड. शिंदे,ॲड. चिंचवडे, ॲड. तेजवानी, ॲड. दातीर पाटील, ॲड. बावले, ॲड. कुटे, माजी उपाध्यक्ष ॲड. कुटे, ॲड. बीडकर, ॲड. शर्मा, ॲड. परदेशी, ॲड. तोडकर, ॲड. मानसी उदासी, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. शंकर घंगाले, ॲड. प्रतीक्षा साखरे, ॲड. भारत सलगर हे सर्व सभासद वकील बार रूमधे उपस्थित होते. त्यावेळी पिंपरी – चिंचवड ॲड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सदस्य ॲड. फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. मीनल दर्शले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. अस्मिता पिंगळे यांनी मानले.