“राजभवनात जाऊन तक्रारीच्या काड्या घालायच्या हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही”

0
771

मुंबई,दि.१०(पीसीबी) – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून “सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र राजभवनात जाऊन तक्रारीच्या काड्या घालायच्या हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, अशी टीका राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे पण ऊठसूट सरकारवर टीका करणं हे चांगलं नाही. जे कोणी करोना संकटाचे राजकारण करू इच्छितात त्यांचे राजकारण जनताच चुलीत टाकेल, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. मात्र विरोधी पक्षाची जास्त ऊठबस राजभवनावर सुरू आहे. अर्थात हीच आपली लोकशाही असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.