राजकारण हा माझा पिंड नाही – उद्यनराजे

0
534

सातारा, दि. १ (पीसीबी) – राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो.  लोकांना आपली काम व्हावीत, अशा अपेक्षा माझ्याकडून असून त्या पूर्ण करेन. याआधी आलेला अनुभव चांगला नव्हता, असे सांगून आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही,  असे माजी खासदार उद्यनराजे भोसले यांनी म्हटले आहे.  

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन  भाजपात गेलेले उदयनराजे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज (मंगळवार)  शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उदयनराजे म्हणाले की,  माझ्या मतदरासंघात जी अनेक वर्षांपासून जवळपास १९९६ पासून कृष्णा खोऱ्याची जी मुलभूत कामे आहेत, ती मार्गी लागलेली नाहीत. तसेच  राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो. कोणाला आवडलं, आवडलं नसेल तर मला काही समस्या नाही, असेही ते म्हणाले.