नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनास गेलेल्या बसचा अपघात; २१ जणांचा मृत्यू

0
360

गुजरात, दि.१ (पीसीबी) – नवरात्रीनिमित्त प्रसिद्ध अंबाजी मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची लग्झरी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. हि घटना बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी गावाच्या जवळ असलेल्या त्रिशुला घाटात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीनिमित्त प्रसिद्ध अंबाजी मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची लग्झरी बस घाटात कोसळून सोमवारी बसला अपघात झाला. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला. अपघातात ५० जण जखमी झाले असून, त्यातील ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.. त्या बसमध्ये ७० भाविक होत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. सर्व अपघातग्रस्त प्रवासी आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यातील आहेत. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.