रहाटणीत इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

0
495

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – राहत्या इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन एका ३० वर्षी तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवार) रहाटणीतील राजगड कॉलनीत घडली.

सुदर्शन प्रभाकर क्षीरसागर (वय ३०, रा. राजगड कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा रहाटणीतील राजगड कॉलनीमध्ये राहतो. आज तो राहत्या घराच्या तीसऱ्या मजल्यावर फोनवर बोलत होता. यादरम्यान त्याने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. मात्र सुदर्शनने आत्महत्या केली नसून त्याचा तोलजाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.