रहाटणीतील रामनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात

0
957

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – रहाटणी, रामनगर येथील गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे यांनी पुढाकार घेतला आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

या कामाचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. रहाटणीतील रामनगर भागात दुषित कमी दाबाने पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. येथील नागरिकांची होणारी तक्रार व त्यांच्या मागणीनुसार नगरसेविका निर्मला कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुढाकार घेत या भागासाठी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार या कामाला सुरूवात झाली आहे. नगरसेविका कुटे यांनी गुरूवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या कामाची पाहणी केली. तसेच रामनगर, महात्मा फुले कॉलनी आणि भालेराव कॉलनीत सुरळित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.