रस्त्याच्या कामासाठी ठेवलेले दहा लोखंडी चॅनेल चोरीला

0
190

सांगवी, दि. ४ (पीसीबी) – रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर ठेवलेले 10 लोखंडी चॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 3) सकाळी पिंपळे सौदागर मधील काटेवस्ती येथे उघडकीस आली.

नारायण भीमाशंकर कोळी (वय 38, रा. भोसरी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बी जी शिर्के कंपनीमध्ये आठ फोर्स सर्विसेस सेक्युरिटी गार्ड तर्फे फील्ड अधिकारी म्हणून काम करतात. पिंपळे सौदागर मधील काटेवस्ती परिसरात भारत पेट्रोल पंप समोरील रोडचे काम करण्यासाठी रोडच्या बाजूला 17 पी क्यू सी चे लोखंडी चॅनल ठेवले आहेत. त्यातील 60 हजार रुपये किंमतीचे 10 लोखंडी चॅनल अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी या कालावधीत चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.