निर्दयीपणाचा कळस। भरधाव गाडी चालवत पहाटे तरुणाला दिली टक्कर आणि…

0
249

मोशी, दि. ४ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका तरुणाला धडक दिली. यामध्ये एक गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 3) मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजताच्या कालावधीत आदर्श नगर मोशी येथे घडली.

जीत सीमाराम पासवान (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार दीपक रणसौर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजताच्या कालावधीत आदर्शनगर, मोशी येथील बाफना ऑटोमोटिव्ह पार्किंग मध्ये अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून मयत जीत याला धडक दिली. यामध्ये जीत याच्या हाताला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालक निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.