‘या’ थ्री स्टार हॉटेलवर पोलिसांचा छापा; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

0
278

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मुंबईतील ग्रांड रोड परिसरात एका थ्री स्टार हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. यानंतर मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका केली आहे.

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दलाल महिलेला रंगेहाथ पकडले. या पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे.

या दोन्ही तरुणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण शासकीय नियम धाब्यावर बसून हॉटेल्समध्ये अवैध धंदे सुरूच आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या बॉलिवूडच्या एका फोटोग्राफरने सेक्स रॅकेट सुरु केलं होतं. नासिर खान याने करण ठाकूर अशा खोट्या नावाने वेश्याव्यवसाय सुरु केला. मात्र मुंबई क्राईम ब्रांचने हे रॅकेट उद्ध्वस्त करत त्याला अटक केली.