धक्कादायक…राज्यात गेल्या २४ तासात म्युकरमायकोसिस रूग्णांची संख्या ‘एवढ्याने’ वाढली

0
237

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : कोरोना रूग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. पण आता महाराष्ट्रासमोर एक नवा प्रश्न उभा राहत आहे. महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा म्हणजेच म्युकरमायकोसिस उपद्रव वाढला आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहे. तर मागील 24 तासात म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे.

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असून गेल्या 6 दिवसात म्युकरमायकोसिस या आजाराने 30 रूग्णांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासापुर्वी म्युकरमायकोसिसची रूग्णसंख्या ही 2 हजारावर होती. सध्या स्थितीत राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णांची संख्या ही 4050 झाली आहे. आता पर्यंत 666 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता पर्यंत राज्यात 288 रूग्णांचा मृत्यु झाला आहे.

म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असताना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता राज्यात भासू लागली आहे. म्युकरमायकोसिस रूग्णांना सरासरी अॅम्फोटेरेसीन – बी याचे 100 डोस लागतात. त्याहिशोबाने महाराष्ट्राला सध्या अॅम्फोटेरेसीन – बी औषधाच्या 2.24 डोसची गरज आहे. पण केंद्र सरकारने 22 हजार डोस पाठवले आहेत. त्यामुळे राज्यात अॅम्फोटेरेसीन – बी औषधांची आणखी टंचाई भासत आहे.

दरम्यान, अॅम्फोटेरेसीन – बी हे औषध 6 ते 8 हजारात मिळत आहे. आता अॅम्फोटेरेसीन – बीचा तुटवडा जाणवू लागल्यानं हे औषध आता काळ्या बाजारात 30 ते 40 हजारात विकलं जात आहे. म्युकरमायकोसिस या आजारावर उपचारासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर मोफत उपचार करता येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं होतं.