‘या’ एक्झिट पोलमध्ये मनसेला मिळणार इतक्या जागा

0
556

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीचे  मतदान संपल्यानंतर बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  पण  कुठल्याही एक्झिट पोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाचे भाकीत केलेले नाही. पण पोल डायरीने केलेल्या  एक्झिट पोलमध्ये मनसेला  १ ते ५ दरम्यान जागा मिळतील,  असा अंदाज वर्तवला आहे.

मनसेला एकाही जागा न दिल्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मनसे समर्थकांनी आपली नाराजीही जाहीर केली व एक्झिट पोल्सच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या सर्व एक्झिट पोल्समध्ये भाजपाला १२१ ते १२८, शिवसेनेला ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ ते ४२, वंचित बहुजन आघाडीला १ ते ४, मनसेला १ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय २५ विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पोल डायरीचा  एक्झिट पोल

विदर्भ – विदर्भात भाजपाला ४० ते ४८, शिवसेनेला ४ ते ८, काँग्रेसला ९ ते १३, राष्ट्रवादीला १ ते ५ आणि मनसेला ० ते २ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र – पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला २३ ते ३१, शिवसेनेला ५ ते ११, काँग्रेसला ७ ते १४, राष्ट्रवादीला १५ ते २१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्र – उत्तर महाराष्ट्रात भाजपाला १८ ते २२, शिवसेनेला ९ ते १५, काँग्रेस ८ ते १२ आणि राष्ट्रवादीला ८ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाडा – मराठवाडयात भाजपाला १४ ते १८, शिवसेनेला १९ ते १३, काँग्रेसला ९ ते १४, राष्ट्रवादीला ६ ते ११ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

कोकण – कोकणात भाजपाला २६ ते २९, शिवसेनेला २८ ते ३२, काँग्रेसला ६ ते १० आणि राष्ट्रवादीला ५ ते ११ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.