…म्हणून सभापती व्यंकय्या नायडू यांना सभागृहात अश्रू अनावर

0
196

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. यावेळच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. अधिवेशनातील बरेच दिवस पेगॅसस आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्यामुळे वायाला गेले आहेत.

अशातच मंगळवारी पुन्हा विरोधक या मुद्यावरुन राज्यसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले. तर काही खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं. मंंगळवारी झालेल्या विरोधकांच्या या गदारोळानंतर आज सभापती व्यंकय्या नायडू यांना सभागृहात अश्रू अनावर झाले. व्यंकय्या नायडू भावूक होत म्हणाले की, काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काही सदस्य वरती चढले तेव्हा या सभागृहाचं पावित्र्य नष्ट करण्यात आलं. विरोधकांनी मंगळवारी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही.

दरम्यान, विरोधी पक्षातील ज्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला त्या खासदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सभागृह नेते पियुष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आहे.