…म्हणून वडिलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय – सोनाक्षी सिन्हा

0
568

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, यावर सिन्हा यांची कन्या व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांनी खूप पूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. माझ्या वडिलांना जो सन्मान मिळायला हवा होता. तो भाजपमध्ये मिळाला नाही, असे तिने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने  खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापले आहे. यामुऴे नाराज सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोनाक्षी सिन्हा  म्हणाली की, हा निर्णय त्यांच्या पंसतीचा आहे. मला वाटते जर तुम्ही कुठे आनंदी नसाल तर तुम्हाला बदल करावा लागतो आणि त्यांनी तेच केले आहे.

माझे वडील पक्षाच्या सुरूवातीपासून सदस्य आहेत आणि त्यांनी मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांनी जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत काम केले आहे. पण आता तो सन्मान त्यांना मिळत नाही, ज्यावर त्यांचा हक्क आहे. मला वाटते त्यांनी हा निर्णय घेण्यास उशीर केला. त्यांनी फार पूर्वीच हा निर्णय  घ्यायला हवा होता, असे सोनाक्षी म्हणाली.