श्रीनगर-जम्मू महामार्गावर सीआरपीएफच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट

0
749

श्रीनगर, दि. ३० (पीसीबी) – श्रीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे एका कारमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. या स्फोटानंतर कारचालक बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरच्या स्फोटात सीआरपीएफच्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचे दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असे वाटत नाही. अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.