…म्हणून मी हर्षवर्धन पाटलांच्या शेजारी बसलो – अजित पवार

0
733

मुंबई,दि.२७(पीसीबी) – सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वत:हून जागा बदलून घेतली होती. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.पुण्यात मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील शेजारी बसलेले. यावेळी दोघांमध्ये गप्पाही झाल्या. यावर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

साखर उद्योगासाठी सरकारची सकारात्मक भूमिका असावी. हा उद्योग राजकारणाच्या पलिकडचा आहे. या उद्योगावर ऊस तोडणी कामगार, कारखान्यातील कामगारवर्ग आणि बँकांसह शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहे.