…म्हणून मी आमदारकीचा राजीनामा दिला – शिवेंद्रराजे भोसले

0
748

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  मतदारसंघातील कामे न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. आज (मंगळवार)  संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.  भाजपसोबत जाणे जास्त योग्य होईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असे सांगून राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे  आज (मंगळवार) सकाळी सुपूर्त केला. यानंतर पुढील दिशा स्पष्ट करताना शिवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेश करण्याचे संकेत दिले.

ते पुढे  म्हणाले की, आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचा शब्द डावलत  नाही. तसेच मी भाजपकडे कोणतीही मागणी केलेली नाही.  माझे प्राधान्य मतदारसंघ आणि त्यातील कामाला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस – राष्ट्वादीचे सरकार येईल, याबाबत शंका आहे, असेही त्यांनी यावेळी  म्हटले.