…म्हणून उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला!

0
452

मुंबई, दि.१८ (पीसीबी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे दौरा लांबणीवर ढकलण्यात आला आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकालाचे स्वागत केले होते. शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन केल्यानंतर तिथली माती घेऊन 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.

उद्धव ठाकरे गेल्या वर्षीही सहकुटुंब 24 नोव्हेंबरलाच अयोध्येला गेले होते. त्यावेळीही त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील माती नेली होती.

दरम्यान, इतकी वर्ष आपण प्रभू रामचंद्र यांच्याविषयीच्या अनेक कथा ऐकत होतो. मात्र, त्यांचा जन्म कोठे झाला होता, होता की नव्हता याच्यावर वाद सुरु होता. हा वाद आता संपला आहे. याचा मला नक्कीच आनंद आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.