म्हणूनच माझा सावरकरांबद्दलचा आदर वाढला – नितेश राणे

0
364
मुंबई, दि.२७ (पीसीबी) – काल स्वा. सावरकर यांची पुण्यतिथी होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपने सावरकर यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र सभाध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उत्तर देताना आधी आमदार नितेश राणेंचे सावरकरांबद्दल मत विचारात घ्या, असा टोला लगावला होता.
याच पार्श्वभूमिवर नितेश राणे म्हणाले  स्वातंत्रवीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. मी भाजप मध्ये आलो म्हणून माझे त्यांच्याबद्दलचे विचार बदलले नसून मी या विषयाचा अभ्यास केला आणि काही गोष्टी समजून घेतल्या, म्हणून मला त्यांचे महत्व लक्षात आले. माणसाचे विचार काळानुसार बदलत असतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला शिव्या घालत होते. पण आज शिवसेना काँग्रेस सोबत आहे, असाही टोला नितेश राणेंनी लगावला. तर राजकारणात हे चालत असते असेही ते म्हणाले. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी सावरकरांबद्दल आक्रमक भाषा वापरली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त होते. आणि म्हणूनच माझा सावरकरांबद्दलचा आदर वाढला, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मांडले आहे.