मोहम्मद शमीला जिल्हा न्यायालयाचा दिलासा; अटक वॉरंटला स्थगिती

0
649

कोलकाता, दि. १० (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पश्चिम बंगालमधील जिल्हा न्यायालयान दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.

शमीविरोधात पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषणप्रकरणी तक्रार केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने गेल्याच आठवड्यात शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

जिल्हा न्यायालयाने १५ दिवसांत शरण येण्याचे आदेश शमीला दिले होते. अलीपूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी शमीविरुद्धच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती शमीचे वकील सलीम रहमान यांनी दिली.

हसीन जहाँनं गेल्या वर्षी शमीविरुद्ध मारहाण, लैंगिक शोषण, हत्येचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसेचे आरोप करून तक्रार दाखल केली होती. त्यांच्यातील तलाक प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. दोघांच्या संबंधांत वितुष्ट निर्माण झाल्यानंतर जहाँनं भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोपही केले होते. मात्र, बीसीसीआयच्या चौकशी समितीन शमीला क्लीन चिट दिली होती.