मोरवाडीत मटनाच्या दुकानाला आग लागल्याने २२ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

0
670

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीमध्ये मटनाच्या दुकानात डांबून ठेवलेल्या तब्बल २२ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) पहाटे पाचच्या सुमारास मोरवाडी लालटोपीनगर येथील ‘शानदार मटण शॉप’ येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पाहटे पाचच्या सुमारास मोरवाडी लालटोपीनगर येथील ‘मारुती टायर आणि पंक्चर’ या दुकानातील कॉम्प्रेसर फुटून आग लागली. ही आग बाजुचे मटनाचे दुकान “शानदार मटण शॉप” येथे देखील पसरली. घटनेची माहिती दुकानाचे मालक माजीद दादामियाँ यांना कळताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला. मात्र फोन लागत नसल्याने त्यांनी संत तुकारानगर येथील अग्निशमन विभागाच्या ऑफीसकडे धाव घेतली. मात्र यामध्ये वेळ लागल्याने दुकानातील तब्बल २२ बकऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.