उदयनराजेंची सरकारवर स्तुतीसुमने; मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या शुभेच्छा कायम राहतील!

0
1157

सातारा, दि. २३ (पीसीबी) – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीस सरकारचे तोंडभरून कौतुक करताना सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सरकार कार्यक्षम  आहे, अशी स्तुतीसुमने उधळली. तर यावर  छत्रपतींच्या शुभेच्छा सोबत आहेत आणि त्या यापुढेही कायम राहतील, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

खंबाटकी घाटात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या ३ मार्गिका जुळे बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. साताऱ्यातील सैनिक शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी  उद्यनराजे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिंचनाच्या मुद्यावरून आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात ८ हजार पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच साताऱ्यामधील भाग दुष्काळी राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.