मोदी,शहा प्रियकर, तर उध्दव ठाकरे त्यांची प्रेयसी – प्रकाश आंबेडकर

0
594

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे. त्यांच्यातील हे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे , त्यामुळे ते तुटणार नाही,  अशा शब्दात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-शिवसेना वादाचा समाचार घेतला.   

नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सवर्णांना आरक्षण हा गेम प्लॅन भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे,  असे यावेळी ते म्हणाले.

शिवसेना  आणि भाजप यांच्यातील  भांडण हे नवरा बायकोचे भांडण नाही, तर हे प्रियकर प्रेयसीचे भांडण आहे. नवरा बायकोचे भांडण असते, तर ते तुटते , पण हे प्रियकर-प्रेयसीचे  भांडण असल्याने ते  तुटतच नाही. यामध्ये अमित शहा प्रियकर आणि उध्दव ठाकरे प्रेयसी आहेत. अमित शहा हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी हा उद्धव ठाकरे यांचा नवा प्रियकर आहे, अशा शब्दांत आंबेडकरांनी टीका केली.