मोदींनी धोनीला फोन करुन टी-२० विश्वचषक खेळायची विनंती करावी; ‘या’ पाकिस्थानी खेळाडूने केली मागणी

0
399

विदेश,दि.१८(पीसीबी) – पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तच्या मते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धोनीला फोन करुन टी-२० विश्वचषकात खेळण्याची विनंती करु शकतात.

शोएब अख्तरने एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत “माझ्यामते धोनीने टी-२० क्रिकेट खेळत रहायला हवं होतं. टी-२० विश्वचषकानंतर तो निवृत्त होऊ शकला असता, पण निवृत्ती घेणं हा त्याचा वैय्यक्तिक निर्णय होता. पण त्याने सगळं काही साध्य केलं आहे. रांची सारख्या शहरातून आलेला मुलगा भारतीय संघाचा कर्णधार होईल असा कोणीही विचार केला नव्हता. सरतेशेवटी जगाने तुम्ही केलेली कामगिरी लक्षात ठेवावी असं प्रत्येक खेळाडूला वाटत असतं आणि भारतासारख्या देशात तर खेळाडूंना कायम सन्मान दिला जातो…धोनीलाही तो कायम मिळत राहील. कोणी सांगावं, भारताचे पंतप्रधान धोनीला फोन करुन टी-२० विश्वचषक खेळण्याची विनंती करु शकतात. पुढचा टी-२० विश्वचषक हा भारतात आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्याला ही स्पर्धा खेळण्याची विनंती करावी. पंतप्रधानांच्या विनंतीला कोणीही नाही म्हणत नाही.” असं म्हटलं आहे.

दरम्यान १९८७ साली जनरल झिया उल-हक यांनी फोन करुन इम्रान खान यांना क्रिकेट सोडू नको असं सांगितलं होतं. इम्रान खान यांनीही त्यांचा मान राखतं पुढची काही वर्ष क्रिकेट खेळणं पसंत केलं…त्यामुळे मोदींनी विनंती केल्यास धोनी कदाचीत टी-२० विश्वचषकात खेळेल असंही शोएब म्हणाला. सोशल मीडियावरही धोनीला निरोपाचा सामना मिळावा अशी चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.