मोदींच्या कट्टर विरोधकाला उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी   

0
1095

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  विरोधक गोवर्धन झडपिया  राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले असून गोवर्धन झडपिया गुजरातमधील वजनदार नेते असून भाजपाने त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे.  २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.  

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप  पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी १७ राज्य प्रभारींची नियुक्ती जाहीर केली. त्यामध्ये झडपिया यांची निवड करण्यात आली आहे. २००२ मध्ये गुजरात दंगलीच्यावेळी गोवर्धन झडपिया गुजरात सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींनी गोवर्धन झडपिया यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली होती. गुजरातमध्ये हार्दिक पटेलला पुढे आणण्यास झडपिया  यांचा हात असल्याचे बोलले जात होते.  तसेच प्रवीण तोगाडियांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख होती.