पुण्यातील बड्या वकिलाला एक कोटी सत्तर लाखाची लाच घेताना अटक

0
2414

पुणे, दि. २७ (पीसीबी) – भूमी अभिलेख कार्यालयातून जमिनीवर असलेली नावे कमी करून देतो त्यासाठी दोन कोटी रुपये लागतील अशी मागणी एका वकिलाने केली. तडजोड करून एक कोटी सत्तर लाखाची लाच घेताना.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वकिलास अटक केली.

अॅड. रोहित शेंडे असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. रोहित शेंडे याने भूमी अभिलेख कार्यालयातले अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. जमिनीवर असलेली नावे कमी करुन देतो. या कामासाठी दोन कोटी रुपये लागतील. पैसे दिल्यानंतर कागदपत्रे दिली जातील असे तक्रारदाराला सांगितले होते. त्यावर तडजोड करून एक कोटी सत्तर लाख रुपये देण्याचे ठरले. वकिलाने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. त्यानंतर वकील रोहित शेंडे याला पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार सापळा रचून एक कोटी सत्तर लाखाची लाच घेताना वकील रोहित शेंडे यास रंगेहाथ पकडले आहे. तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.